Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर 6 वार करण्यात आले होते. त्यातील दोन जखमा या गंभीर स्वरुपाच्या असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असल्याचे समोर येत आहे. लीलावती रुग्णालयाचे अधिकारी डॉ. नीरज उत्तमणी यांनी सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून त्याला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसंच, सैफच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे. लीलावती रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. पण मणक्याजवळ खोलवर वार गेला होता. त्यानंतर न्यूरोसर्जन यांच्याकडून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. साधारण 2 ते 2.30 तासांपर्यंत ही शस्त्रक्रिया सु ही दिलासादायक बाब समोर आली आहे.
सैफ अली खानच्या टीमनेदेखील त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सैफ अली खानची प्रकृतीवरील धोका टळला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसंच, डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. सैफ अली खान यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मणक्याच्या ठिकाणी चाकूचा वार खोलवर गेला होता. त्यामुळं येथील शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. मात्र जवळपास दोन ते अडीच तासांपर्यंत ही शस्त्रक्रिया चालली होती. आता शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून त्याला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आलं आहे.