वाईन, डाईन आणि फाईन.. राज ठाकरेंच्या मागणीवर 'सामना'तून चिमटे

मद्यविक्री सुरू करण्याची राज ठाकरेंची मागणी 

Updated: Apr 25, 2020, 11:58 AM IST
वाईन, डाईन आणि फाईन.. राज ठाकरेंच्या मागणीवर 'सामना'तून चिमटे  title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. राज्य चालविण्यासाठी महसुलची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरेंच्या या मुद्यावरून सामना अग्रलेखातून त्यांना चिमटे काढण्यात आले आहेत. 

राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दुःख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर अशी टीका राज ठाकरेंवर करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनाची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. अशा शब्दात सामनातून टीका केली आहे. 

एवढेच नव्हे तर लॉकडाऊनमध्ये महसुल निर्माण होण्यासाठी मद्यविक्रीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणी असली तरी एक समस्या आहेच. कारण लॉकडाऊनमुळे फक्त मद्यविक्रीच नाही तर मद्यनिर्मिती करणारे कारखानेदेखील बंद आहेत. याची आठवण सामना अग्रलेखातून करून देण्यात आली आहे. मद्यविक्रीकरता अगोदर कारखाने सुरू करावे लागतील. तेव्हाच त्यांचा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचणार आहे. सरकारने लॉकडाऊन शिथिल करून काही प्रमाणात दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र मॉल्स, शॉपिंग सेंटर, सलून, दारू दुकानांवर बंदी कायम ठेवली आहे.