कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, यासाठी ६९ जिल्ह्यात रँडम चाचणी होणार

 कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असताना कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.  

Updated: May 15, 2020, 12:03 PM IST
कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, यासाठी ६९ जिल्ह्यात रँडम चाचणी होणार  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असताना कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणूला रोखायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव देशात किती प्रमाणात झाला आहे तसेच विषाणूचा प्रसार कशा पद्धतीने होत आहे, याची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ६९ जिल्ह्यात रँडम चाचणी होणार आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव कसा होता, याकरिता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्राने २१ राज्यांतील ६९ जिल्ह्यात स्वैर (रँडम) चाचणी करण्याचे ठरविले असून आहे. महाराष्ट्र राज्यातील बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, सांगली या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. 

यामुळे एक प्रकारे देशातील संसर्गाची चाचपणी होणार आहे. या सर्वेक्षणातून मिळालेल्या निकालाची कोरोनासंदर्भांतील पुढील दिशा ठरविण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, देशात कोरोना बाधितांचा आकडा ८१९७० इतका असून २७९२० रुग्ण बरे झाले आहेत. तर २६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २७५२४ इतका आहे. आतापर्यंत राज्यात६०५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०१९ जणांना आतार्यंत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्ग झालेले ३ हजार ७२२ नवे रुग्ण देशभरात काल आढळले तर १३४ जणांचा काल या आजारानं मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ हजार ५४९ जणांचा बळी कोविड १९ मुळे गेला आहे. मात्र यातल्या ७०% रुग्णांना इतर गंभीर आजार होते. देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७८ हजार ३ झाली असून ४९ हजार २१९ जणांवर उपचार सुरु आहेत तर २६ हजार २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ३३ पूर्णांक ६३ शतांश टक्के झालं असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.