राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी केले मतदान, मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

राज्यसभेचे खासदार सुभाष चंद्रा यांनी मतदानाचा हक्क बजावला.  

Updated: Oct 21, 2019, 05:14 PM IST
राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी केले मतदान, मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन title=

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी  (Maharashtra Assembly Elections 2019) सोमवारी २८८ जागांसाठी मतदान होत आहे. राज्यसभेचे खासदार सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत लोकांना जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन केले. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. देशाच्या विविध भागात पोटनिवडणुकाही घेण्यात येत आहेत. मी या राज्यांच्या आणि मतदारांनी मोठ्या मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही उत्सव समृद्ध करा. तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे  आवाहन मोदी यांनी केले.

राज्यात एकूण ८,९७,२२,०१९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ९६,६६१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. वयोमानानुसार मतदारांविषयी सांगायचे झाले तर १८ ते २५  वयोगटातील मतदारांची संख्या १,०६,७६,०१३ आहे. २५ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या ३,१३,१३,३९६ आहे आणि ४० ते ६० वयोगटातील मतदारांची संख्या ३,२५,३९,०२६ आहे. तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांची संख्या १,५१,९३,५८४ आहे. मतदारांच्या संख्येनुसार सर्वात मोठा विधानसभेचा मतदारसंघ हा पनवेल आहे. याठिकाणी ५,५४,८२१ मतदार आहेत. वर्धा हा सर्वात छोटा विधानसभेचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी २,७७,९८०  मतदार आहेत.