मुंबई : महाराष्ट्राशी प्रतारणा करणारे दळभद्री राजकारण मी करत नाही. मदत मागितली असती तर, स्वत:हून केली असती. शिवसेनेकडून असल्या राजकारणाची अपेक्षा नव्हती, अशी खंत व्यक्त करत आता हातावर नाही, तर गालावर टाळी मिळेल, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला आहे.
मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने त्यांना पक्षप्रवेश दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. दरम्यान, या चर्चेवर राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाबद्धल राज ठाकरे यांची प्रतिक्रीया काय याबाबत महाराष्ट्रातून उत्सुकता होती. अखेर राज ठाकरे यांनी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत फुटलेले नगरसेवक आणि शिवसेनेचे राजकारण यावर सविस्तर प्रतिक्रीया दिली.
काय म्हणाले राज ठाकरे?
- मदत मागितली असती तर, नक्कीच केली असती - राज ठाकरे
- आता हातावर टाळी नाही आता गालावर टाळी - राज ठाकरे
- जे विकले गेले आणि विकत घेतले गेले त्यांच्याशी माझ्या पक्षाचा संबंध नाही - राज ठाकरे
- शिवसेनेने मराठी मानसाचा विश्वासघात केला - राज ठाकरे
- मला घाणेरड्या राजकारणाची किळस - राज ठाकरे
- जे मानसिकदृष्ट्याच भ्रष्ट आहेत ते राहून तरी काय करणार - राज ठाकरे
- आपल्या कृतीमुळे राजकारणात चुकीचा पायंडा तर, पडत नाही याचे भान सर्वच राजकीय पक्षांनी बाळगायला हवे - राज ठाकरे
- नगरसेवक फुटू शकतील याची कुणकूण दिड महिन्यापूर्वीच लागली होती - राज ठाकरे
- पैसे टाकून असलं दळभद्री राजकारण हे मला जमत नाही - राज ठाकरे
- दोन द्यावेत दोन घ्यावेत हे माझं राजकारण आहे - राज ठाकरे
- उद्धव आणि त्याच्या सहकाऱ्याकडून अत्यंत निच खेळी खेळण्यात आली. हे मी विसरणार नाही - राज ठाकरे
- मी बाळासाहेबांकडून राजकारण शिकलो. त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण करत नाही - मनसे
- मी बाहेर पडलो तेव्हा मी अनेक आमदार, नगरसेवक बाहेर पडायला उत्सुक होतो - राज ठाकरे
- शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा मी, बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो - राज ठाकरे
- महाराष्ट्राशी प्रतारणा करणारं राजकारण मी करणार नाही - राज ठाकरे
- शरद पवारांनी फोडाफोडी विषयी बोलूच नये