मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजय मिळवला असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे आधीपासून भाजपाच्या ज्या गोष्टीवर आक्षेप घेत होते, किंवा संशय व्यक्त करत होते, त्याचा आधार घेत त्यांनी पुन्हा हे वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जोडण्यावरून प्रचंड विरोध केला आहे. अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयावर राज ठाकरे यांनी अवघ्या एका शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत, विजयोत्सवात रंगलेल्या भाजपाला टोला हाणला आहे. राज ठाकरे यांनी भाजपाचा कर्नाटकात झालेल्या विजयावर म्हटलं आहे, 'एव्हीएममशीन की जय!' ( लाईव्ह अपडेटसाठी क्लिक करा http://zeenews.india.com/marathi/live )
राज ठाकरे हे नेहमीच आपल्या सभांमधून भाजपांचा, मोदींचा तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेत असतात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील कार्याची वाहवा करणारे पहिले नेते देखील राज ठाकरेच होते.
मात्र राज ठाकरे यांनी भाजपाचे नेते खोटं बोलतात आणि खोटी आश्वासनं देतात अशी टीका केली होती, यानंतर आज राज ठाकरे यांनी आज कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे, 'एव्हीएममशीन की जय!' असल्याचं म्हटलं आहे.