मुंबई : सोशल मीडियावर 'देशहिता'साठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्या माथेफिरुवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या फेसबुकवर पेजवर भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर या मथळ्याखाली एक फोटो पोस्ट करण्यात आला.
शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावरचे महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या हितसाठी उभे आयुष्य वेचले आहे. त्यांच्याबद्दलची अशी पोस्ट टाकणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ही धमकीवजा पोस्ट गांभीर्याने घेऊन संबधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Will u arrest this account holder who open talks to assisinate ... just go thru his tweet @Dev_Fadnavis @CPMumbaiPolice @ThaneCityPolice @OfficeOfRG @uddhavthackeray @INCIndia @SitaramYechury @MPSharadYadav @MallikarjunINC @MamataOfficial @yadavakhilesh @yadavtejashwi pic.twitter.com/Ej9ZHBXLXv
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2018