मोदींच्या दौऱ्याच्या पोस्टरसाठी, प्रभो शिवाजीराजा सिनेमाची पोस्टर हटवली

शिवजयंतीच्या मुहुर्तावर आज प्रदर्शित होणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट प्रभो शिवाजी राजा याचे होर्डिंग्ज मुंबईत लावण्यात आले होते. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 16, 2018, 11:35 AM IST
मोदींच्या दौऱ्याच्या पोस्टरसाठी, प्रभो शिवाजीराजा सिनेमाची पोस्टर हटवली title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या मुंबई दौऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच्या चित्रपटांच्या होर्डिंग्जवर संक्रात आली आहे. शिवजयंतीच्या मुहुर्तावर आज प्रदर्शित होणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट प्रभो शिवाजी राजा याचे होर्डिंग्ज मुंबईत लावण्यात आले होते. 

चित्रपटाचे होर्डिंग्ज काढून त्या ठिकाणी मोदींचे होर्डिंग्ज

मात्र नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे होर्डिग्ज लावायचे असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाचे होर्डिंग्ज काढून त्या ठिकाणी मोदींचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. 

निर्मात्याकडून संबंधित कंपनीला १२ लाख रुपये

विशेष म्हणजे प्रभो शिवाजी राजा चित्रपटाचे होर्डिंग्ज लावण्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्याने संबंधित कंपनीला १२ लाख रुपये देऊन होर्डिग्जच्या जागा आधीच बुक केल्या होत्या. 

हेच का शिवछत्रपतींचे आशीर्वाद?

मात्र तरीही मोदींसाठी छत्रपतींचे पोस्टर काढण्यात आली. छत्रपतींच्या आशीर्वादाची घोषणा देणाऱ्या राज्य सरकारने मोदींसाठी छत्रपतींना बाजूला केल्याची चर्चा सुरू झाली आहे.