BMC Political News : मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेला (ठाकरे गट) दिलेल्या कार्यालयावरही शिंदे गटाने दावा केला. (Maharashtra Political News) हा दावा करताना पालिकेच्या कार्यालयात घुसून ताबा घेतला. या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी शिवसेनेच्या कार्यालयाला टाळं ठोकले आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे. त्याचवेळी एक मोठी बातमी हाती आली. मुंबई महापालिकेतली सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहेत.
शिंदे गटाने पालिकेत घुसून कार्यालय ताब्यात घेतल्याने मोठा राडा पाहायला मिळाला. आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही राजकीय वाद उमटू नये म्हणून मुंबई महापालिकेतली सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गट(Thackeray Group Vs Shinde Group) यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. निमित्त आहे ते मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयाचे. पालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिंदे गट थेट मुंबई महापालिकेत घुसला आणि कार्यालयावर जबरदस्तीने ताबा मिळवला. या कार्यालवावरॉ बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे. शितल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव आणि इतर नेते उपस्थित होते. शिंदे गटाने काल शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी राडा घातला होता. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट भिडले होते. अखेर महापालिका आयुक्तांनी सर्वच पक्षांची कार्यालयं तात्पुरत्या स्वरुपात सील केली आहेत.
मुंबई पालिकेतील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज ठाकरे गटाचे नगरसेवक पालिका मुख्यालयात जमणार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या नगरसेवकांना पोलिसांचे चौकशीसाठी फोन केले जात आहेत. पोलीस स्थानकात बोलावून खोट्या गुन्हात अडकवलं जाईल, अशी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भीती आहे. दोन्ही गटातील उपस्थितांची चौकशी करावी, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.