बाबा सिद्दीकी प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांना घटनास्थळी सापडलं आणखी एक पिस्तूल, कोणी आणलं होतं?

Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 15, 2024, 03:24 PM IST
बाबा सिद्दीकी प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांना घटनास्थळी सापडलं आणखी एक पिस्तूल, कोणी आणलं होतं?  title=

Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे. आज सापडलेलं पिस्तूल फरार झालेल्या आरोपीचे असण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली आहे. 

गोळीबार केल्यानंतर दोन आरोपी हे घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या गार्डनमधून पळाले. त्यावेळी निर्मल नगर पोलिस स्थानकाचे कॉन्स्टेबल वाकडे यांनी एका आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि त्याच्याकडे असणारे पिस्तूल हस्तगत केलं. मात्र, एक आरोपी फरार झाला होता, त्याने फेकुन दिलेले पिस्तुल आता सापडलं आहे. 

चौथी आरोपी अटकेत

पुण्यातील भंगार विक्रेता हरीशकुमार बालकराम (23) याला उत्तर प्रदेशातील बहराइचमधून पैशांचा पुरवठा आणि रसद पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील बहराइच येथील हरीशकुमार बालकराम (23) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे. 

आरोपी कुर्ल्यात होते वास्तव्यास

बाबा सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या करणारे तिन्ही आरोपी कुर्लामधील पोलिस पटेल चाळीत १४ हजार भाडे देऊन राहत होते, सध्या या घरात त्यांचे कपडे, चप्पल, पाण्याच्या रिकाम्य बाटल्या, हेल्मेट व मिठाईचा बॉक्स हे सापडलं आहे. त्याच परिसरात त्यांची MH 17 AP 2972 या नंबरची बाईक पार्क करण्यात आली आहे.