Narendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi) 

Updated: Jan 19, 2023, 07:27 AM IST
Narendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ  title=
PM Narendra Modi in Mumbai

PM Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi) 

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बीकेसी मैदानावर संध्याकाळी भव्य सभाही आयोजित करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचं राज आहे. यंदा मात्र मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तेव्हा मोदींच्या हस्ते मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचाच नारळ फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.