कोरोनामुळे राज्यातील अनाथ बालकांनाही गमवावा लागला जीव; अदिवासी विभागाकडून आकडेवारी समोर

राज्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतू गेल्या तीन वर्षात विविध कारणांमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये 353 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Updated: Feb 18, 2022, 12:31 PM IST
कोरोनामुळे राज्यातील अनाथ बालकांनाही गमवावा लागला जीव; अदिवासी विभागाकडून आकडेवारी समोर title=

मुंबई : राज्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतू गेल्या तीन वर्षात विविध कारणांमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये 353 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

राज्यातील अदिवासी आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या अनेक अनाथ मुलांना कोरोनाची लागण झाली होती. या आदिवासी आश्रमशाळांमध्ये कोरोनाने थैमान घातला. 

विशेष म्हणजे कोरोना कालावधीत शाळा बंद असतानाही 146 बालकांचा मृत्यू झालाय. आदिवासी विकास विभागाकडे ही नोंद करण्यात आली आहे.