कर्जमाफीच्या श्रेयापासून शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न?

राज्यातील शेतक-यांना दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी पार पडणार आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सह्याद्रीवर होणा-या या कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. 

Updated: Oct 17, 2017, 06:35 PM IST
कर्जमाफीच्या श्रेयापासून शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न? title=

मुंबई : राज्यातील शेतक-यांना दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी पार पडणार आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सह्याद्रीवर होणा-या या कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. 

शिवसेना सत्तेत सहभागी असताना आणि कर्जमाफीसाठी शिवसेनेनं आग्रही भूमिका घेतलेली असतानाही उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाला न बोलावण्याचं कारण काय, असा सवाल आता केला जातोय. 

कर्जमाफीच्या श्रेयापासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लांब ठेवण्यासाठी त्यांना बोलावणं पाठवलेलं नसावं, अशी चर्चा रंगलीय. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात कर्जमाफी कार्यक्रमात पालकमंत्री सहभागी होणार असून, त्यात शिवसेनेच्या मंत्र्यांचाही समावेश असणाराय...