तर परीक्षा फी न घेता नव्याने परीक्षा घेतली जाईल, राजेश टोपे यांची मोठी घोषणा

पेपरफुटीचे विधिमंडळात पडसाद, संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

Updated: Dec 22, 2021, 06:53 PM IST
तर परीक्षा फी न घेता नव्याने परीक्षा घेतली जाईल, राजेश टोपे यांची मोठी घोषणा title=

मुंबई : आरोग्य भरती घोटाळा प्रकरणानंतर विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल. जर पुन्हा परिक्षा घ्यायची ठरले तर विद्यार्थी कडून परिक्षा फी घेतली जाणार नाही, विद्यार्थी आर्थिक नुकसान होणार नाही, संपूर्ण परिक्षा भरतीत गडबड झाल्याचे रिपोर्ट समोर आले तर पुन्हा १०० टक्के नव्याने परिक्षा घेतली जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. पोलिस चौकशी तपास आल्यानंतर परिक्षा पुन्हा घ्यायचा का याबाबत निर्णय घेतला जाईल असं राजेश  टोपे यांनी म्हटलं आहे.

दलालांची ओडीओ क्लिपची सायबर पोलिस तपास करत आहे. त्यात काही तथ्य आढळत असेल नक्की कारवाई केली जाईल. लिंक असेल ती उघड होईल, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आरोग्य विभागाने स्वत: एफआयआर दाखल केला आहे असंही टोपे यांनी सांगितलं. रिटायर्ड चीफ सचिवांकडून आरोग्य भरती घोटाळ्याची चौकशी केली जाईल असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

तुर्तास परिक्षा संपूर्ण रद्द करून नव्याने घ्या विरोधकांच्या मागणी मान्य करण्यास मात्र राजेश टोपे यांनी हरकत घेतली. न्यासा कंपनी काळ्या यादीतील नाही अशी माहिती राजेश टोपे यांनी सभागृहात दिली. 

गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं, जे लोक दोषी आहेत, त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही, गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. पोलीस तपासात माहिती समोर आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

'शासकीय यंत्रणा सडलेली'
दरम्यान नोकर भरती घोटाळ्यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यामनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सरकारच्या काळात एकही परीक्ष घोटाळ्याशिवाय होत नाही. परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरो मंत्रालयापर्यंत पोहचले असून शासकीय यंत्रणा सडलेली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यानी केला. 4 कंपन्या वगळून न्यासालाच कॉन्ट्रॅक्ट का ?  'जीए सॉफ्टवेअर कंपनी काळ्या यादीतून बाहेर कशी? असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.