Aryan khan Drug case:पंच गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी का काढला होता ? कारण आलं समोर

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवे खुलासे आणि चकित करणारी माहिती समोर येत आहे.

Updated: Jun 2, 2022, 03:50 PM IST
Aryan khan Drug case:पंच गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी का काढला होता ? कारण आलं समोर    title=

मेघा कुचिक, झी मीडिया मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवे खुलासे आणि चकित करणारी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील पंच साक्षीदार किरण गोसावीने आर्यन खान समवेत काढलेला सेल्फी चांगलाच व्हायरल झाला होता. तो त्याने का काढला होता हे आता समोर आले आहे. या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)विशेष तपास पथकाने (SIT)न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहेत. यामध्ये याच सेल्फीचा उलगडा झाला आहे.

आधी मीडियाला दिली खोटी माहिती
गोसावीने मीडियाला सांगितले होते की,  त्यांनी अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी यांना फोन केला होता. कारण एनसीबीने ताब्यात घेतलेल्या आर्यन खानला तिच्याशी बोलायचे होते. त्याने दावा केला होता की ददलानीने कॉल उचलला नाही, म्हणून त्याने ददलानीसाठी आर्यनची व्हॉईस नोट रेकॉर्ड केली होती. मात्र  त्या सेल्फी आणि आर्यनच्या व्हॉईस नॉटचे खरं कारण आता समोर आले आहे. 

एनसीबी कार्यालयात दुसरा पंच साक्षीदार प्रभाकर सेलने आर्यनच्या काढलेल्या व्हिडिओबद्दल गोसावीने सांगितले की,"मी यावर काहीही बोलू इच्छित नाही कारण या व्हिडिओमुळे मला सर्वत्र दोषी ठरवण्यात आले आहे. हा फक्त एक सामान्य कॉल होता. माझ्या मित्राला फक्त आर्यन खानचा आवाज ऐकायचा होता म्हणून तो व्हिडिओ केला होता." गोसावीने आर्यन खानसोबत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर सेल्फी काढला होता आणि नंतर व्हायरल झालेला व्हिडिओ त्याने एनसीबी कार्यालयात शूट केला होता. व्हिडिओमध्ये गोसावी हा आर्यनसोबत होते आणि फोनवर बोलत होते.

आर्यनला NCB कार्यालयात ओढत का नेले ?
अटकेच्या रात्री आर्यन खानला एनसीबी कार्यालयात किरण गोसावी ओढत नेताना दिसला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना गोसावी म्हणाला की, एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे पुरेशी वाहने नव्हती. म्हणून त्याने त्याची कार एनसीबीला ऑफर केली होती. त्याने पुढे सांगितले की,"जेव्हा आम्ही एनसीबी कार्यालयात पोहोचलो तेव्हा एनसीबी कार्यालयाच्या आजूबाजूला ब्रीच मीडिया होती आणि आम्हाला ताबडतोब तिसर्‍या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय असलेल्या ठिकाणी धावत जाण्यास सांगण्यात आले. माझ्या शेजारी असलेल्या आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयाची माहिती नव्हती. मी मीडियाला टाळण्यासाठी त्याचा हात धरला आणि सर्व सामान मागे ठेवून NCB कार्यालयाकडे धाव घेतली."

सेल्फीचे रहस्य काय ?
 विशेष तपास पथक (SIT)कडे किरण गोसावीने नोंदवलेल्या जबानीत सांगितले की, त्याने आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी आर्यनबरोबर सेल्फी काढला होता. एवढंच नव्हे तर आर्यन खानचा आवाज ऐकण्याची विनंती करणाऱ्या मित्राला कॉलही केला होता.