मंत्री नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर?

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे.  

Updated: Nov 27, 2021, 11:50 AM IST
मंत्री नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? title=
संग्रहित छाया

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी खोट्या तक्रारी दाखल करण्यात गुंतले आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अधिकारी षडयंत्र रचत आहे. काही लोकं माझ्या घरावर आणि शाळेवर पाळत ठेवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. (Nawab Malik Makes Serious Allegations Against Central Investigation system)

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Twitt) यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत. यापार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला. केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी खोट्या तक्रारी करण्यासाठी हालचाल करीत आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

ट्विट करताना मलिक म्हणाले, हे लोक गेल्या काही दिवसांपासून वाहनात बसून माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत आहेत.जर कोणी त्यांना ओळखत असेल तर कृपया मला कळवा.या चित्रात जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मी सर्व माहिती देईन.

राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी हा खळबळजनक आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मलिक यांनी असं आम्ही काही होऊ देणार नाही. या षडयंत्राबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक अनिल देशमुख झाले तसे अनेक अनिल देशमुख होतील हा त्यांचा गैरसमज आहे. पण आम्ही हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही योग्य ती कारवाई करु, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

जे लोक माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे. त्यांचे पुरावे माझ्याकडे आले आहेत. खोटी तक्रार माझ्याविरोधात केली आहे. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे, असे नवाब मलिक सांगितले.