ठाणे : दक्षिण आफ्रिकेमदध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने संपूर्ण जगातील शास्त्रज्ज्ञांचं टेन्शन वाढलं आहे. भारत सरकारनेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. तर ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, 90 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.
यामध्ये तब्ब्ल 90.46% ठाणेकरांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मात्र लस घेतल्यावरही 7 टक्के ठाणेकरांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या नाहीत. माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीत अँटीबॉडीजचं प्रमाण सर्वात कमी आहे. याचप्रमाणे उथळसर भागात सर्वाधिक अँटीबॉडीज आहेत. झोपडपट्टीच्या तुलनेत इमारतींमधील नागरिकांत अधिक अँटीबॉडीज आढळून आल्याची नोंद आहे.