विधान परिषदेत मुंडे भाऊ-बहीण यांची अशीही जुगलबंदी

महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेकांची चुलत भावंडं. पण दोघांमधून विस्तवही जात नाही.  मात्र विधान परिषदेत मंगळवारी वेगळंच चित्र दिसलं. 

Surendra Gangan Updated: Mar 20, 2018, 05:26 PM IST
विधान परिषदेत मुंडे भाऊ-बहीण यांची अशीही जुगलबंदी title=

मुंबई : महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेकांची चुलत भावंडं. पण दोघांमधून विस्तवही जात नाही.  मात्र विधान परिषदेत मंगळवारी वेगळंच चित्र दिसलं. 

कुपोषण कमी झालं

एकमेकांना कायम पाण्यात पाहणाऱ्या या चुलत भावंडांनी चक्क एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली. अंगणवाडी सेविकांमुळं कुपोषण कमी झालं, असं प्रशस्तीपत्र धनंजय मुंडेंनी दिलं. त्यावर कधी नव्हे ते माझ्या खात्याचं सभागृहात कौतुक झालं. त्याबद्दल मी विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

अंगणवाडी सेविकांना मेस्मा

मात्र अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याच्या मुद्यावरून यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.