बारामतीकरांचं काय ठरलंय? अजित पवारांच्या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा

Maharashtra Assembly Election: बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा हायहोल्टेज सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट  

शिवराज यादव | Updated: Nov 1, 2024, 07:36 PM IST
बारामतीकरांचं काय ठरलंय? अजित पवारांच्या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा title=

Maharashtra Assembly Election:  बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा हायहोल्टेज सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट... 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये (Baramati) प्रचारा दरम्यान केलेल्या या विधानाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे लोकसभा निवडणुकी दरम्यान बारामतीकरांनी ठरवल्याची आठवण अजित पवारांनी करून दिली. बारामतीच्या आखाड्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयांमध्ये झालेली लढत लक्षवेधी ठरली होती. तेव्हा बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना पसंती दिली होती.

अजित पवारांनी बारामती मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी त्यांनी तब्बल 59 गावांचा दौरा केला. लोकसभेप्रमाणेच बारामती विधानसभेलाही काँटे की टक्कर टक्कर होणार आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये जरी लढत होत असली तरी खरा सामना हा शरद पवार आणि अजित पवारांमध्येच आहे हे सांगायला कोण्या राजकीय पंडिताची आवश्यकता नाही. त्यामुळे अजितदादांनी लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या बारामतीकरांच्या वायद्याची आठवण करून दिल्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे पाहावं लागणार आहे.