सिनेट निवडणुकीला किती मतदारांची हजेरी? कशी पार पडली प्रक्रिया? जाणून घ्या

Mumbai University Sinet Election: माहिती मिळेपर्यंत सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 24, 2024, 08:04 PM IST
सिनेट निवडणुकीला किती मतदारांची हजेरी? कशी पार पडली प्रक्रिया? जाणून घ्या title=
सिनेट निवडणुकीला किती मतदारांची हजेरी?

Mumbai University Sinet Election: मुंबई विद्यापीठाची बहुचर्चित सिनेट निवडणूक आज सुरळीत पार पडली.  मतदार नोंदणी झाल्यानंतर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. यानंतर 22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती. यालादेखील स्थगिती देण्यात आली होती. अखरे आज 24 सप्टेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम  28(2)(न) नुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता आज सुरळीत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी माहिती मिळेपर्यंत सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 

38 मतदान केंद्र आणि 64 बुथ

या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी एकूण 28   उमेदवार उभे होते. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडली. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणूकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली होती. 38 केंद्र आणि 64 बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. आहे.

निवडणूकीचा निकाल

या निवडणूकीचा निकाल 27 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केला जाणार असल्याचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.

मुंबई सिनेट निवडणुकीच्या स्थगिती संदर्भातील याचिका मागे 

मुंबई सिनेट निवडणुकीच्या स्थगिती संदर्भातील याचिका महाराष्ट्र स्टुडंट युनियनने मागे घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती. एकीकडे मतदान होत असताना आपण स्थगितीची मागणी करत  आहात या संदर्भात कोर्टाने विचारला असता आपण ही याचिका मागे घेत असल्याचं महाराष्ट्र स्टुडंट युनियन कडून सांगण्यात आलंय. या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असताना आणि मतदान होत असताना अशा प्रकारे याचिका करण्यात कुठलाही आधार नसल्याचं कोर्टाने म्हटलंय.