कामाचे पैसे देतो म्हणून बोलावले, कोल्ड्रिंगमध्ये अमली पदार्थ आणि नको ते..' भाजप उपजिल्हाध्यक्षावर गुन्हा

Vasai Crime: पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजप पदाधिकारी गांगेश्र्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव आणि नवीन सिंग या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 24, 2024, 04:17 PM IST
कामाचे पैसे देतो म्हणून बोलावले, कोल्ड्रिंगमध्ये अमली पदार्थ आणि नको ते..' भाजप उपजिल्हाध्यक्षावर गुन्हा title=
वसई भाजप उपजिल्हाध्यक्षावर गुन्हा

Vasai Crime: वसईत एका 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. यातील आरोपींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या घटनेत वसई भाजप उपजिल्हाध्यक्ष संजू श्रीवास्तव यांच्यासह त्याच्या साथीदारावर आचोळे पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया. 

वसईतील आचोळे पोलीस ठाण्यात 22 वर्षीय पीडितेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये होळीच्या दिवशी 2 आरोपींनी तिला एका रिकाम्या खोलीमध्ये बोलवले आणि कामाचे पैसे देतो असे सांगितले. त्यानंतर आपल्या कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिक्स केले. पुढे बेशुद्ध करुन दोघांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

पीडित तरुणीने आचोळे पोलीस ठाण्यात घडलेली घटना सांगितली.  पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजप पदाधिकारी गांगेश्र्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव आणि नवीन सिंग या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक केली नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा श्रींगी दिली आहे.

बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम

डोंबिवलीत विवाहितेने दोन वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि मग...

डोंबिवलीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सुखी संसार सुरु असताना अचानक सगळचं सपलं आहे. एका विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. डोंबिवलीच्या रूनवाल मायसिटी या उचूभ्र सोसायटीत ही अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थाळावरुन मृतदेह ताब्यात घेतले आहेत.  डोंबिवलीच्या रूनवाल मायसिटी या उचूभ्र सोसायटीमध्ये आय टी इंजिनियर राहुल सकपाळ, पत्नी पूजा, अपंग आई आणि दोन वर्षांची समृद्धी या मुलीसोबत राहत होते. मात्र पूजाने दोन वर्षांच्या समृध्दीची रुमालाने गळा दाबून हत्या केली आणि स्वतः पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं.