Thackeray Group vs Shinde Group : दादरमधल्या राड्याप्रकरणी (Dadar Rada) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar), समाधान सरणवकर (Samadhan Sarvankar), संतोष तेलवणे (Santosh Telwane) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्म्स ऍक्ट (arms act) अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. सरवणकरांनी पोलीस स्टेशन समोरच जमिनीवर गोळी चालवली होती अशी माहिती पोलीसांमधल्या सूत्रांनी दिलीय. प्रभादेवीतील शिंदे गट-ठाकरे गट (Shinde Group vs Thackeray Group) राडा प्रकरणी शिवसैनिक (Shivsainik) आता आक्रमक झालेयत. दादर पोलीस स्टेशनबाहेर (Dadar Police Station) शिवसेनेने (Shivsena) घोषणाबाजी केलीय. मारहाण प्रकरणी शिवसेनेच्या 5 जणांना अटक करण्यात आलीय. या पाच आरोपींविरोधात 395 अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. ठाकरे गटानं आक्रमक होत याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर गुन्हा मागे घेण्यात आलेत. पाचही जणांना जामीन मिळाला असून त्यांना सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गटातला संघर्ष कमालीचा टोकाला गेलाय. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या दादरमधल्या कार्यालयाबाहेर लावलेलं पोस्टर फाडण्यात आलंय. समाधान सरवणकर यांचं पोस्टर फाडण्यात आलं तर सदा सरवणकर यांच्या पोस्टरवर दगडफेक करण्यात आली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर फाडल्याचा आरोप करण्यात आलाय.
काय होता वाद
मुंबईच्या प्रभादेवीत शिंदे गट विरुद्ध शिवसेनेतील वाद पुन्हा पेटलाय. गणपती मिरवणुकीतील वादाचं हाणामारीत रुपांतर झालं होतं. त्यानंतर आज सकाळपासून दोन्ही गट दादर पोलीस स्टेशन परिसरातही आमनेसामने आले. यावेळी शिवसेनेच्या महेश सावंतांकडून (Mahesh Sawant) शिंदे गटाच्या संतोष तेलवणेंना मारहाण करण्यात आली.
या राड्याप्रकरणी शिवसेनेच्या महेश सावंत यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली. या राड्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला असा आरोप आमदार सुनील शिंदेंनी केला होता. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले. या घटनेनंतर पोलिसांनी सदा सरवणकर यांची चौकशी केली. या राड्याच्या घटनेमुळे प्रभादेवीत तणावाची स्थिती निर्माण झालीय.