मुंबई उपनगर जिल्ह्यात 'पालकमंत्री आपल्या भेटीला उपक्रम, आतापर्यंत 170 तक्रार अर्ज प्राप्त

लहान मुलांसाठी 'खिलखीलहाट' रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार - मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Updated: Oct 6, 2022, 10:28 PM IST
मुंबई उपनगर जिल्ह्यात 'पालकमंत्री आपल्या भेटीला उपक्रम, आतापर्यंत 170 तक्रार अर्ज प्राप्त   title=

मुंबई : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी  यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर  'खिलखीलहाट'  रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. घाटकोपर इथल्या एन वॉर्ड इथं आज 'पालकमंत्री आपल्या दारी' हा उपक्रम सुरू झाला. यावेळी पूनम नायर या महिलेने लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मिळत नसल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत  अशी तक्रार केली होती. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शहा, एन वॉर्डचे सहायक आयुक्त संजय सोनवणे, अपर जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे,निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपायुक्त देविदास क्षीरसागर, यासह  सर्व विभागाचे अधिकारी,  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले, गुजरात शासनाने लहान मुलांसाठी 'खिलखीलहाट' ही  रुग्णवाहिका योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर मुंबई उपनगर परिसर इथं  'खिलखीलहाट' रुग्णवाहिका सुरू करणार आहे. यावेळी पालकमंत्री यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील समस्या जाणून घेवून त्यावर कार्यवाही करण्यात येइल असं सांगितलं. ज्या नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत त्यांच्या टोकन क्रमांका नुसार अर्ज निकाली काढू असे नागरिकांना त्यांनी आश्र्वासित केलं.

यावेळी मेट्रो पूलाच्या खालील पार्किंग हटवणे, अनधिकृत दुकानांवर कारवाई करणे, नाल्यांचे खोलीकरण, म्हाडा, रस्ते दुरुस्ती, रस्ते रुंदीकरण, पाणी कमी दाबाने येणे, छत्रपती शिवाजी मैदान येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने केलेले खोदकाम पूर्ववत करून पार्क सुस्थितीत करने, सहकारी गृहनिर्माण संस्था मधील सभासदांना विश्वासात न घेता कार्यकारी मंडळ यांच्या मनमानी कारभार, ड्रेनेज मुळे निर्माण झालेल्या समस्यावर तोडगा काढणे, म्हाडा यासह 170 विविध विषयांवर अर्ज आले होते. त्यापैकी 102 अर्जदारांनी  प्रत्यक्ष आपल्या तक्रारी  मांडल्या. पालकमंत्री  यांनी  सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.

साऊथ वॉर्ड येथे उद्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' 
दि.६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत 'पालकमंत्री आपल्या भेटीला' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील  नागरिकांनी, आपल्या तक्रारीच्या अर्जासह 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमामध्ये सहभागी  व्हावे असं आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.
 
शुक्रवार दि.०७/१०/२०२२ रोजी आर साऊथ वॉर्ड, 
शनिवार ०८/१०/२०२२ रोजी के ईस्ट वॉर्ड,
सोमवार दि.१०/१०/२०२२  रोजी आर सेंट्रल वॉर्ड,
बुधवार दि. १२/१०/२०२२ रोजी एल वॉर्ड,
गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी एस वॉर्ड,
शुक्रवार दि.१४/१०/२०२२ रोजी  एम ईस्ट वॉर्ड,
शनिवार  दि.१५/१०/२०२२ एच वेस्ट वॉर्ड,
सोमवार दि.१७/१०/२०२२ रोजी आर नॉर्थ वॉर्ड येथे,
बुधवार,दि १९/१०/२०२२ रोजी पी नॉर्थ वॉर्ड येथे,
गुरुवार दि २०/१०/२०२२ रोजी पी साऊथ वॉर्ड येथे,
सोमवार येथे ३१/१०/२०२२ रोजी एम वेस्ट वॉर्ड येथे,
बुधवार दि.०२/११/२०२२ रोजी के वेस्ट वॉर्ड येथे,
गुरुवार दि. ०३/११/२०२२ रोजी एच ईस्ट वॉर्ड येथे,शुक्रवार दि.४/११/२०२२ रोजी टी वॉर्ड इथं नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. नियोजित रोजी सकाळी १० वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम  वरील प्रमाणे सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी: https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in
वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.