मुंबई : मुंबई पुणे प्रवास फक्त २० मिनिटात होणार असे कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे शक्य आहे. हायपरलूपच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.
राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने गुरुवारी यासंदर्भातील करार केला आहे. व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी हा करार करण्यात आला आहे.
पुणे - मुंबई दरम्यान हायपर लूप करता येईल का? त्यात काय अडचणी येऊ शकतात? प्रकल्पाचा खर्च किती असेल आणि प्रवाशांची संख्या किती असेल. याचा अहवाल पुढल्या सहा आठवड्यांत हायपर लूप वन ही कंपनी आणि पीएमआरडीए एकत्रितपणे तयार करणार आहेत.