मुंबई महापालिकेतील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, यशवंत जाधव यांच्या नावाला फासला लाल रंग

मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटाचा दावा, पालिका आयुक्तांनी ऑफिस सील केल्यामुळे ठिय्या आंदोलन, महापालिकेत पोलीस दाखल 

Updated: Dec 29, 2022, 02:24 PM IST
मुंबई महापालिकेतील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, यशवंत जाधव यांच्या नावाला फासला लाल रंग title=

Mumbai Politics : मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) राड्यानंतर ठाकरे गट (Thackeray Gorup) आक्रमक झालाय. सर्व पक्षांची कार्यालयं आयुक्तांनी (BMC Commissioner) सील केल्यानंतर ठाकरे गटातील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांची भेट घेतली. कार्यालयं उघडून कामकाजासाठी खुली करावी असं निवेदन ठाकरे गटाने दिलंय. कार्यालयं सील केल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला असून, ऑफिससाठी महापालिकेत माजी नगरसेवकांनी ठिय्या मांडला. यावेळी आयुक्त आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.

यशवंत जाधवांच्या नावाला फासला लाल रंग
मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या (Shivsena) कार्यालयाच्या उदघाटनावेळी लावण्यात आलेल्या बोर्डवर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांचं नाव होतं. मात्र जाधव शिंदे गटात (Shinde Group) गेल्यावर ते नाव ठाकरे गटाकडून झाकण्यात आलं. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुंबई महापालिकेच्या कार्यालयात आले आणि त्यांनी या बोर्डावरचं यशवंत जाधव यांचं नाव लाल रंगानं मिटवून टाकलं.

सर्व पक्षांच्या कार्यालयांना टाळं
मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेला (ठाकरे गट) दिलेल्या कार्यालयावरही शिंदे गटाने दावा केला. (Maharashtra Political News) हा दावा करताना पालिकेच्या कार्यालयात घुसून ताबा घेतला. या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी शिवसेनेच्या कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. शिंदे गटाने पालिकेत घुसून कार्यालय ताब्यात घेतल्याने मोठा राडा पाहायला मिळाला. आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही राजकीय वाद उमटू नये म्हणून  मुंबई महापालिकेतली सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे.

राहुल शेवाळे यांच्या कृतीवर नाराजी
मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिंदे गट काल थेट मुंबई महापालिकेत घुसला आणि कार्यालयावर जबरदस्तीने ताबा मिळवला. या कार्यालवावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे. दरम्यान, राहुल शेवाळे यांच्या कृतीवर शिंदे गटाते प्रवक्ते किरण पावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. काल काही आमचे नगरसेवक कार्यालयात गेले. आमचा ताबा घ्यायचा हेत्तू नाही. दादागिरी करण्याची गरज ही नाही. मुंबई आम्ही जिंकू आणि सर्वस्वी कार्यालय आम्ही घेऊ, दादागिरी दाखवत कार्यालय घ्यायची गरज ही नाही असं सांगत किरण पावसकर यांनी नाराजी व्यक्त केली.

संजय राऊत यांचा घणाघात
कालच्या राड्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर घणाघात केलाय. शिंदे गट हा घुसखोरच आहे, गद्दार कुठेही घुसतात, पण महापालिकेत शिवसेनेला बहुमत आहे. त्यामुळे कार्यालयावर हक्क आमचाच असा दावा राऊतांनी केलाय .तर मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले कधी घुसतील ते कळणार नाही असा टोलाही राऊतांनी शिंदेंना लगावलाय.