Crime News : मुंबई पोलिसांच्या WhatsApp Group वर कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अश्लिल व्हिडीओ झळकला आणि...

मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या व्हिडीओमुळे सर्वानाच धक्का बसला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला नोकरी देखील गमवावी लागली आहे. तसेच आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचे आयुष्य उद्धवस्त झालंय

Updated: Jan 7, 2023, 03:32 PM IST
Crime News : मुंबई पोलिसांच्या WhatsApp Group वर कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अश्लिल व्हिडीओ झळकला आणि... title=

Crime News : सोशल मीडियावर सध्या गोष्टी वेगाने व्हायरल होताना दिसतात. एखादा फोटो किंवा व्हिडीओ (Viral Video) क्षणाधार्त सर्वांच्याच मोबाईलमध्ये दिसतो. पण काही वेळा चुकीच्या व्हायरल झाल्याने एखाद्याचे आयुष्यही उद्धवस्त होऊ शकतं. असाच काहीसा प्रकार मुंबईत (Mumabi News) समोर आलाय. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अश्लील व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर (WhatsApp Group) शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. या कृतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला आपली नोकरी गमवावी लागली आहे. घटनेची माहिती मिळताच सर्वांनाच धक्का बसला.

मुंबई पोलिसांच्या WhatsApp Groupवर अश्लील व्हिडीओ

मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी हा नो पॉलिटिकल मॅसेज या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा सदस्य होता. या ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे या ग्रुपमध्ये अनेक पोलीस कर्मचारी सहभागी आहेत. 9 डिसेंबर रोजी या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचा एक अश्लील व्हिडीओ ग्रुपमध्ये शेअर केला होता. हा व्हिडीओ इतरांसह ग्रुपमध्ये असलेल्या इतर पोलिसांनी पाहिला होता. मात्र या व्हिडीओमध्ये असणारी महिला ही त्याच ग्रुपमध्ये असणाऱ्या एका दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी होती. व्हिडीओ पाहिल्यानंतर इतर सदस्यांनाही धक्का बसला.

पत्नीची तक्रार करण्यास नकार

व्हिडीओमध्ये जी महिला होती त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीकडे याबाबत चौकशी केली. तसेच पत्नीला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या व्हिडीओवरुन सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार करण्यास सांगितले. मात्र पत्नीने असे करण्यास नकार दिला. या पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीच्या नातेवाईकांना बोलवून तिला त्यांच्यासोबत साताऱ्याला पाठवून दिले.

त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने 9 डिसेंबर रोजी व्हिडीओ पाठवणारा पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी आणि  पॉलिटिकल मेसेज नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्या ग्रुपमध्ये 126 पोलीस कर्मचारी होते.

या व्हिडिओमुळे आपली प्रतिष्ठा डागाळल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. पोलिसांनी भादवि च्या कलम 292, 293, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67A आणि कलम 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर मानहानीचा गुन्हाही दाखल केला आहे.

यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या पोलीस कर्मचार्याला नोटीस बजावली असून त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तक्रारदाराने नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपींवर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.