मुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना चिरडलं

Chunabhatti Accident : मुंबईत रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 9, 2023, 10:46 AM IST
मुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना चिरडलं title=

Mumbai News : मुंबईतील (Mumbai) चुनाभट्टी (Chunabhatti) येथे रविवारी सकाळी एका भरधाव आरसीसी मिक्सर ट्रकने ( RCC mixer truck) चार वाहनांना धडक दिल्याने मोठा अपघात घडलाय. या अपघात एकाचा बळी गेला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हाय वेजवळ हा भीषण अपघात घडला आहे. चुनाभट्टीजवळ भरधाव मिक्सर ट्रकने चार वाहनांना अक्षरक्षः चिरडलं आहे. या मिक्सर ट्रकने दोन ऍक्टिव्हा, एक मोटार सायकल आणि एक पीयुसी व्हॅनला धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून जखमींना जवळच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळहून फरार झाला आहे. चुनाभट्टी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

अपघातानंतर सिमेंट मिक्सरचा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन आदळला दिसतो. या धडकेमुळे रस्त्यातील स्पीड ब्रेकरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात सहभागी झालेल्या दोन दुचाकींचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. तर पीयुसी व्हॅन या धडकेने पूर्णपणे चिरडली गेली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारीव (वय 31) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 
सुदैवाने कारमधील इतर प्रवासी बचावले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा जवळील खडवली फाट्याजवळ कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारला मागच्या बाजूस जोरदार धडक दिली. त्यानंतर कंटेनर चालकाने कारला फरफटत नेत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यावेळी आईस्क्रीम खात उभे असलेले तीन ते चार जणही दुचाकीसह चिरडले गेले. या भीषण अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक कार आणि आईस्क्रीमच्या टेम्पोचं नुकसान झालं.