Local Train Update : देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मध्य रेल्वेचा रात्रकालीन मेगा ब्लॉक आज म्हणजे शनिवारी 24 फेब्रुवारी ते रविवारी 25 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उपनगरीय भागांवर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत, अप जलद मार्गावरील सेवा त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार मुलुंड स्थानकावरुन अप धीम्या मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान वळवण्यात येतील आणि माटुंगा येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
मध्य आणि हार्बर रेल्वे रात्रकालीन मेगा ब्लॉक घेणार आहे. मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी हा मेगाब्लॉक घेतला जाणार असून उद्या पहाटे 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे. तर पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईनवर मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांपासून पहाटे 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
25 फेब्रुवारीच्या 03.55 पासून (बेलापूर लोकल) सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि 04.27 पर्यंत (पनवेल लोकल) आणि पनवेल/बेलापूरसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 00.40 पर्यंत सुटतील. रविवारी 25 फेब्रुवारीच्या ०४.४० मधील लोकल रद्द राहतील. 24 फेब्रुवारीच्या 23.18 पासून ते 25 फेब्रुवारीच्या 04.33 पर्यंत पनवेल येथून सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून 00.05 वाजता ठाण्याहून पनवेलकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल 24 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 23.14 वाजता सुटेल. 25 फेब्रुवारी 00.34 वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 04.32 वाजता सुटेल आणि 25 फेब्रुवारी रोजी पनवेल येथे 5.52 वाजता पोहोचेल.
ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथून 00.03 वाजता सुटेल. 25 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 01.20 वाजता पोहोचेल. तसेच पनवेल येथून सुटणाऱ्या ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल 04.49 वाजता असेल आणि 25 फेब्रुवारी रोजी 06.08 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल 24 फेब्रुवारी रोजी ठाणे येथून 23.32 वाजता सुटेल आणि 25 फेब्रुवारी रोजी 00.24 वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने ठाणे येथून सुटणारी पहिली लोकल 05.12 वाजता असेल आणि 25 फेब्रुवारी रोजी 06.04 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून 22.15 वाजता सुटेल आणि 24 फेब्रुवारी रोजी 23.07 वाजता ठाणे येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून 04.53 वाजता असेल आणि 25 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे 05.45 वाजता पोहोचेल. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.