Mumbai Airport : अरे एवढी लोकं कुठे निघाली देश सोडून?

Mumbai News : मुंबई विमानतळावर असंख्य लोकांनी एकच गर्दी केली होती. एवढ्याली लोक एकत्र देश सोडून का जातं आहे असा प्रश्न पडला आहे. 

Updated: Dec 13, 2022, 09:13 AM IST
Mumbai Airport : अरे एवढी लोकं कुठे निघाली देश सोडून?  title=
Mumbai International Airport creates new RECORD 1.5 lakh single day flyers nmp

Mumbai : या महिन्यांच्या सुरुवातीला अचानक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai International Airport) सर्व्हर डाऊन (Mumbai Airport Server Down) झाल्यानंतर प्रवाशांचे खूप हाल झाले होते. यावेळी विमानतळावर खूप मोठी गर्दी झाली होती. आता परत मुंबई विमानतळाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

रेकॉर्डब्रेक गर्दी 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अजून एक रेकॉर्डब्रेक (RECORD) गेला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये दीड लाख प्रवाशी परदेशात (1.50 lakh passengers in a single day) गेले आहेत. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच (highest passenger count since Covid) एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशी परदेशात गेले आहेत. मुंबई विमानतळाने धावपट्टीवरून 24 तासांत 969 टेक ऑफ आणि यशस्वी लँडिंग करून जगात एक नवा विक्रम नोंदवला आहे. ख्रिसमस (Christmas 2022) आणि इयर एन्डनिमित्त (happy New Year 2023) सध्या सुट्ट्यांचा (holiday) आनंद लुटण्यासाठी भारतीयांनी परदेशाचा निवड केली आहे.  (Mumbai International Airport creates new RECORD 1.5 lakh single day flyers) 

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबई विमानतळाने स्वतःचा 935 रेकॉर्ड मोडून हा नवा विक्रम केला आहे. न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि दिल्ली यांसारख्या मेगा सिटीजमध्ये दोन किंवा अधिक धावपट्ट्या एकत्र काम करतात. मात्र, मुंबईत दोन धावपट्ट्या आहेत, मात्र दोन्ही एकमेकांना ओलांडतात, त्यामुळे एकावेळी एकच धावपट्टी वापरली जाते. तांत्रिकदृष्ट्या यामुळे मुंबई विमानतळ सिंगल एअरपोर्टच्या श्रेणीत येते. यामुळे, मुंबई विमानतळ हे सर्वात व्यस्त धावपट्टी आहे. (Mumbai International Airport creates new RECORD 1.5 lakh single day flyers) 

मुंबईत दररोज 900 हून अधिक विमानांची ये जा होते. एमआयएएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला आशा आहे की लवकरच आम्ही दररोज 1000 चा आकडा पार करू. 

सगळ्यात व्यस्त विमानतळ

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरलयं. सिंगल क्रॉसओव्हर रनवेवर या विमानतळाने 10 डिसेंबर 2022 रोजी हा विक्रम नोंदवला. या विमानतळावरून 1 लाख 50 हजार 988 प्रवाशांसह विक्रमी प्रवासी वाहतूकही केली गेली.