Mumbai Crime: खाण्यापिण्याच्या बाबतीत नागरिक नेहमीच सतर्क असतात. असे असले तरी ऑनलाइन माध्यमातून किंवा हॉटेलमध्ये झालेल्या दुर्लक्षामुळे अनेकदा ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. मालाड मधील आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याची घटना घडल्याने मुंबईभरातून यावर संताप व्यक्त करण्यात आला. तसेच ऑनलाइन फूड डिलीव्हरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे बोट तिथल्या कर्मचाऱ्याचे होते,असे काही दिवसांनी तपासात समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आता कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचे तक्रार करण्यात आली आहे. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या प्रतीक रावत या 25 वर्षाच्या तरुणाने कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती. आरामता कोल्ड कॉफी पिऊ असे त्याच्या डोक्यात असताना कोल्ड काफी पाहून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. कारण या कोल्ड कॉफीमध्ये प्रतीकला झुरळाचे अवशेष आढळून आले होते. त्याने यासंदर्भात तात्काळ तक्रार दाखल केली.
30 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या सुमारास तक्रारदार प्रतीक आणि त्याचा मित्र गणेश केकान हे मालाड पश्चिमच्या इन्फिनिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या लाउंज''मध्ये गेले होते. येथे गेल्यावर त्यांनी 2 कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या. वेटरने कॉफी आणली. दोघा मित्रांनी कोल्ड कॉफी पिण्यास सुरुवात लागली. पण त्यांना या कॉफीची चव नेहमीप्रमाणे लागली नाही. पहिल्या सिपमध्ये कॉफी कडवट लागल्याचे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी तात्काळ वेटरला बोलवले आणि कॉफीमध्ये स्वीट टाकण्यास सांगितले.
Health Alert A customer at Open Shine Sheesha & Restaurant, Solitaire Building, Malad, opposite Infinity 2, allegedly discovered a dead cockroach in his cold coffee after consuming 70 of the beverage. Serious concerns raised over hygiene. Authorities urged to take swift action. pic.twitter.com/6gMmxYvTlP
— mumbaiuncensored (uncensoredlive) August 30, 2024
वेटर दोघांचे ग्लास बार काऊंटरवर घेऊन गेला आणि कॉफीमध्ये स्वीट टाकून परत त्यांना कॉफीचे ग्लास आणून दिले. आता प्रतीक आणि त्याचा मित्र पुन्हा कोल्ड कॉफी पिऊ लागले. कोल्ड कॉफी काचेच्या ग्लासमधून देण्यात आली होती. हे दोघे स्ट्रॉच्या माध्यमातून कॉफी पीत होते. कॉफी पिऊन संपत आली आणि थोडी कॉफी ग्लासमध्ये शिल्लक राहिली होती. इतक्यात त्यांना कॉफीत काहीतरी असल्याचे जाणवले. स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी बारकाईने पाहणी केली. समोर दिसलेला प्रकार पाहून त्यांना संताप अनावर झाला. कारण आपल्या कोल्ड कॉफीमध्य झुरळ होते, असे प्रतीक सांगतो. त्याने लगेचच ही बाब आपल्या मित्राच्याही लक्षात आणून दिली आणि त्याचा फोटो काढले. यानंतर दोघांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी मालाड पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकारानंतर मालाड पोलिस अॅक्शन मोडवर गेले. त्यांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर कलम 125,274,275 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.