CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी  फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 28, 2024, 08:49 PM IST
CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार? title=
Mumbai Local Train Update soon 24 coach local trains will run from CSMT

Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी  फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. नोव्हेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होणं अपेक्षित असून आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालं आहे. फलाट क्रमांक १० ते १४ विस्तारला जाणार असून  सध्या फलाट क्रमांक १०, ११ चा विस्तार झाला आहे. १२, १३ क्रमांकाच्या फलाटांची दुरुस्ती सुरू आहे. सर्व पायाभूत कामं नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य मध्य रेल्वेने निश्चित केलंय. त्यानंतर १० ते १३ या फलाटांवरून २४ डब्ब्यांची रेल्वेगाडी धावण्यास सज्ज होणार आहे.

साधारणपणे 8 रेल्वेगाड्यांच्या डब्ब्यात वाढ होणार आहे. तसंच लोकमान्य टिळक टर्मिनसचा विस्तार केला जाणारेय. परळ टर्मिनस उभे करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच तो मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे सादर केला जाणार आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक 10 ते 10च्या विस्ताराला 2015-16 साली मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पाची एकूण किंमत 62.12 कोटी रुपये अपेक्षित आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम नोव्हेंबर 2024पर्यंत पूर्ण होणार आहे. 

दरम्यान, सीएसएमटीवरील रेल्वेगाड्यांचा भार कमी करण्यासाठी आणि लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी 2016 साली परळ टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. तसेच, एलटीटी अतिरिक्त फलाट उभे करण्याचे काम सुरू आहे. तसंच, लोकमान्य टिळक टर्मिनसचा विस्तार करण्याची योजना देखील आखण्यात आली आहे. चार अतिरिक्त फलाटांचे बांधकाम झाल्यास एलटीटीमध्ये रेल्वेगाड्यांची ये-जा आणि प्रवाशांच्या रहदारीची क्षमता वाढेल.