मुंबईच्या अक्षय जंगमची कौतुकास्पद कामगिरी! घडवला इतिहास

अक्षय जंगम तुझा महाराष्ट्राला अभिमान! घडवला मोठा इतिहास 

Updated: Jan 31, 2022, 07:02 PM IST
मुंबईच्या अक्षय जंगमची कौतुकास्पद कामगिरी! घडवला इतिहास  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई : नुसती स्वप्न पाहून होत नाही तर ती साकार करण्यासाठी अहोरात्र त्यासाठी झटावं लागतं. प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यामागे धावावं लागतं. आता बातमी आहे मुंबईसह महाराष्ट्रातील अभिमानाची. या तरुणाच्या कामगिरीनं महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

महाराष्ट्राच्या अक्षय जंगमने 26 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता एव्हरेस्ट बेस कॅम्पसरकरून इतिहास घडवला. या मोहिमेचे आयोजन 360 एक्सप्लोरर मार्फत आनंद बनसोडे यांनी केले होते. एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू होता. तर दुसरीकडे हा तरुण एव्हरेस्ट बेस कॅम्प शिखर सर केला. त्याने एव्हरेस्टवर तिरंगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा  फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. 

अक्षय जंगम हा एक खासगी कंपनीत काम करतो. लहानपणापासून त्याला गिर्यारोहणाची आवड आहे. ही मोहीम करताना अक्षयला आपल्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागली. त्याने केवळ लिक्वीड फूड घेतलं. हा नवा विक्रम त्याने करत एव्हरेस्ट बेसकॅम्प सर करून इतिहास रचला. 

अक्षयने दिलेल्या माहितीनुसार या एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची 5364 मीटर म्हणजेच जवळपास 18000 फूट आहे. या आधी आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341 फूट आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, आणि उणे तापमानात वादळी वाऱ्यातही अक्षय मागे फिरला नाही. त्याने ही मोहीम पूर्ण केली. 

6 दिवसांची मोहीम अक्षयने 4 दिवसातच पूर्ण करून 19 फेब्रुवारी 2021 रोजी शिवजयंती साजरी केली होती. शिवाजी महाराजांची प्रेरणा माझ्या मनात होती. माझे कुटुंब, आनंद बनसोडे व महाराष्ट्रातील तमाम लोकांमुळे हे यश मिळाले आहे. माझे हे यश महाराजांना मी समर्पित करतोय अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली आहे.