मनसेची वादळी बैठक, नेते-राज ठाकरेंमध्ये खडाजंगी

मुंबईत झालेली आजची मनसेची बैठक चांगलीच वादळी ठरली.

Updated: Jun 30, 2018, 02:36 PM IST
मनसेची वादळी बैठक, नेते-राज ठाकरेंमध्ये खडाजंगी title=

मुंबई : मुंबईत झालेली आजची मनसेची बैठक चांगलीच वादळी ठरली. सातत्यानं मनसे अपयशी ठरत असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांना फैलावर घेण्याऐवजी नेत्यांनीच राज ठाकरेंना थेट अनेक सवाल केले. केवळ मराठीच्या मुद्यावर सत्तेत येणं कठीण असल्याचं बाळा नांदगावकरांनी बोलून दाखवलं. तर मराठीचा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरत असल्याचं खापर राज ठाकरेंनी नेत्यांवर फोडलं.

काय घडलं बैठकीत?

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

पक्षातुन लोकं सोडून जात आहेत. आपण गप्प का ? 

पक्षात त्यावर चर्चा का होत नाही?

पक्ष सोडणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न होत नाही, त्यांना विरोधही होत नाही

पक्षाला लागलेली गळती वाईट आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते पक्ष सोडतायत

माध्यमांत फक्त ठराविक प्रवक्ते जातात

प्रसारमाध्यमांनी आपल्याला चर्चा-कार्यक्रमांसाठी बोलावणं थांबवलंय

पक्षाची शेतकरी सेना नेमकं काय काम करीत आहे ? 

पक्षाची महिला सेना काय काम करीत आहे ?

असाच गोंधळ पक्षात असेल तर पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देतो

आयुष्यभर राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करीत राहिन.

अनिल शिदोरेना तुम्ही तुम्हाला लागणारे विविध संदर्भ जमा करण्यापुरतं मर्यादित ठेवा.

त्यांना पक्षाची संघटनात्मक बांधणी, नेमणुका या जबाबदाऱ्या देऊ नका

फक्त मराठीच्या मुद्यावर सत्तेत येता येणार नाही.

राज ठाकरे काय म्हणाले?

तुम्हा नेत्यांना मराठीचा मुद्दा किती पटलाय? मला वाटत नाही तुम्हाला पटलाय

मराठीचा मुद्दा किंवा अन्य भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यात तुम्ही अपयशी ठरले आहात

प्रवक्ते स्वतः पत्रकार परिषद का घेत नाही ?

भाजपचा वर्षाचा सोशल मीडियाचा खर्च 400 कोटी आहे

मग आपल्या पक्षाला निधी-देणगी का मिळत नाही ?

बाविस्कर जळगावमधले पक्षाचे नगरसेवक पक्षातून कसे गेले?

दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांसमोर वाकू नका

एखादा मुद्दा प्रभावीपणे मांडा

मीडियाशी चांगले संबंध असले पाहिजेत

२०१४ निवडणूक आता डोक्यातून काढून टाका

भाजपचा ईव्हीएममुळे विजय झाला आहे. यापुढे मोदी पंतप्रधान होणार नाहीत

येत्या 2 वर्षात मनसेची कार्यालयाची स्वतःची इमारत असेल

संदीप देशपांडे काय म्हणाले?

सध्याच्या पक्ष कार्यालयात सकारात्मक ऊर्जा नाही, ते बदला

तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलं पाहिजे

नाशिकमध्ये पक्षाने एवढं चांगलं काम केलं तरी नगरसेवक आपल्याला सोडून गेले. 

ते का गेले, याचा खुलासा लोकांपुढे कधीच झाला नाही

आपण आपल्या यशस्वी आंदोलनाचं मार्केटिंग का केलं नाही ?

महिलांच्या विषयांवर भूमिका मांडण्यासाठी पक्षात महिला प्रवक्त्या हव्यात