डॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे

कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.  

Updated: Apr 4, 2020, 12:32 PM IST
डॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे   title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचे संकट जगात आहे. मात्र, आपल्या राज्यात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे. सगळ्यांनी कृपा करुन लॉकडाऊन पाळले गेले पाहिजे. कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे. या संकटाच्या काळात पोलीस,  डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो, असा थेट सवाल  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करताना असे हल्ले करणाऱ्यांना चांगले फोडून काढले पाहिजे, असे म्हटले. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल गेले पाहिजे. तरच यांना चांगली जरब बसेल, असेही राज ठाकरे म्हणालेत.

 अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना सोडता कामा नये. लॉकडाऊन संपले की आम्ही आहोत. कोरोनाच्या संकटातही पोलीस आणि डॉक्टर जीवमुठीत घेऊन काम करत आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना सहकार्य करायला हवे. मात्र, काही ठिकाणी परिस्थिती नेमकी उलटी दिसत आहे. पोलीस आणि डॉक्टरांवर हात उचलला जात असेल तर ते खपवून घेता कामा नये. हा संदेश गेला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणालेत. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीत कठोर पावले उचलावी लागतील. तशी विनंतीच मी मुख्यमंत्र्यांना केली आहे,  असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, लॉकडाऊनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहिल. तसेच लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल. कृपा करुन लॉकडाऊन पाळा, असे आवाहन  राज ठाकरे केले आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी इतकी शांतता आपण ९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती, असे राज ठाकरे सांगितले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदी यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते, तसे त्यांनी तसे काहीही केलेले नाही. ज्या लोकांनी डॉक्टरांवर हात उचलला आहे, असा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल करायला हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण अशा काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाऊन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच, असा सष्ट इशारा दिला आहे.