Mira Raod Murder Case : म्हणून सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, आरोपी मनोज सानेच्या जबाबात धक्कादायक खुलासा

Mira Road Murder Case : बुधवारी संध्याकाळी, 56 वर्षीय व्यक्तीला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याबद्दल आणि मुंबईतील मीरा रोड येथील त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय निर्माण आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 8, 2023, 03:37 PM IST
Mira Raod Murder Case : म्हणून सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, आरोपी मनोज सानेच्या जबाबात धक्कादायक खुलासा title=

Mira Road Murder Case : बुधवारी मीरा रोड परिसरातील एका सोसायटीतून महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मीरा भाईंदर परिसरात मीरा रोडवर असलेल्या गीता आकाश इमारतीच्या (Geeta Akash Building) फ्लॅटमध्ये मनोज साने (Manoj Sane) नावाच्या व्यक्तीने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे. एवढंच नाही तर आरोपीने करवतीच्या मदतीने सरस्वती वैद्य (Saraswati Vidya) नावाच्या महिलेने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तुकडे कुकरमध्ये शिजवून ते कुत्र्यांना खाऊ घातल्याचे समोर आले आहे. मृतदेहाचे तुकडे एका पिशवीत बांधून आरोपी साने त्याची विल्हेवाट लावणार होता. मात्र शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

मीरा रोड येथील गीता आकाश इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 704 मधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी संध्याकाळी 7 वाजता पोलिसांना दिली होती. पोलिसांनी दार उघडून पाहिले असता सर्वांना धक्काच बसला. घरामध्ये सरस्वती वैद्य यांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. आरोपी मनोज साने याने अर्धवट मृतदेह घरातच टाकून दिला होता. मनोजनेच सरस्वतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मनोजने हे कृत्य केल्याचा संशय आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी सरस्वतीची हत्या झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी मनोजला अटक केली आहे.

मात्र पोलिसांच्या चौकशीत मनोज सानेने धक्कादायक खुलासा केला आहे. मनोज सानेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सरस्वतीने 4 जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. "त्यादिवशी मी घरी पोहोचलो तेव्हा पाहिले की, सरस्वती बेडवर मृतावस्थेत पडली होती आणि विष प्राशन केल्याने तिच्या तोंडातून फेस येत होता. सरस्वतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल होईल, अशी भीती मला वाटत होती. म्हणूनच मी तिच्या प्रेताचे तुकडे केले आणि नंतर त्याची विल्हेवाट लावली," असे मनोजने सांगितले.

7 जून रोजी या इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना सानेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसात केली. ही बाब कळताच पोलीस पथकासह पोहोचले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना महिलेचे फक्त पाय शिल्लक असल्याचे आढळून आले. महिलेचे उर्वरित अवयव आरोपीने छाटले आणि जवळच्या भाईंदर शहरातील उत्तन समुद्रकिनारी फेकून दिले होते. काही अवयव कुत्र्यांना खाऊ घालण्यात आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीने आधी मृतदेहाचे काही तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकले आणि नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड केले आणि कुत्र्यांना खाऊ घातले.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून सरस्वती वैद्य सानेसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, साने सरस्वती वैद्य यांना 16 वर्षांपूर्वी एका रेशन दुकानात भेटला, जिथे तो काम करत होता. ते दोघे एकाच समुदायाचे होते आणि नंतर त्यांच्यात संबंध निर्माण झाले. सानेला वाटलं की वैद्य अनाथ आहे त्यामुळे ते दोघेही एकत्र राहू लागले.