पोलिसांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक, मात्र सभा होणारच; MIM भूमिकेवर ठाम

मुंबईतील साकीनाक्यात थोड्याच वेळात एमआयएमचे प्रमुखे असुद्दीन औवेसी (MIM Chief Asaduddin Owaisi) यांची सभा होणार आहे.  

Updated: Dec 11, 2021, 07:02 PM IST
पोलिसांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक, मात्र सभा होणारच; MIM भूमिकेवर ठाम title=

मुंबई : मुंबईतील साकीनाक्यात थोड्याच वेळात एमआयएमचे प्रमुखे असुद्दीन ओवैसी (MIM Chief Asaduddin Owaisi) यांची सभा होणार आहे. मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी या प्रमुख मागणीसाठी या सभेचे आयोजन करण्यात आलंय. यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणाहून एमआयएमचे कार्यकर्ते हे मुंबईत दाखल होत आहेत. (mim rally mumbai imtiaz jaleel and workers come in mumbai asaduddin owaisi sabha in sakinaka Chandivali)

मात्र मुंबईत ओमायक्रॉनचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून 12 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीनुसार कोणतीही राजकीय सभा घेण्यास परवानगी नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या सभेला परवानगी नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र यानंतरही एमआयएम नियोजित सभा घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे ही नियोजित सभा होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

या नियोजित सभेसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. ही तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाली. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते होते. मात्र जमावबंदी असल्याने पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना वाशी आणि मानखुर्द इथे अडवलं. यानंतरही कार्यकर्ते ही सभा होणारच, असा ठाम निर्धार हा कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. यामुळे सभेच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान या नियोजित सभेसाठी एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे दुपारीच मुंबईत दाखल झालेत. मुंबईतील जे डब्लू Marriott या हॉटेलमध्ये ते सध्या वास्तव्यास आहे. यामुळे या हॉटेलमधील सुरक्षाव्यवस्था वाढण्यात आली आहे.