मुंबई : मुंबईमध्ये एमआयएमची तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना रॅली काढण्याचा निर्धार खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
ठाण्यातही एमआयएम कार्यकर्त्यांना अडवलं. तर नवी मुंबईतही कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत. तरीही कार्यकर्ते रॅलीसाठी येण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. दोन गाड्या नवी मुंबईमध्ये अडवण्यात आल्या आहेत.
मालेगावच्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही कार्यकर्ते मुंबईला जाण्यासाठी ठाम होते. सुमारे साडेपाच तास केले होते स्थानबद्ध केलं होतं.
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.खालिद परवेज यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मुंबईकडे निघाले आहेत.
मुंबईच्या दिशेने औरंगाबादहून एमआयएमचे कार्यकर्ते गाड्या घेऊन रवाना झाले आहेत. मुस्लीम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे अशी एमआयएमची मागणी आहे. नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर आणि मानखुर्द येथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस वे ने खोपोली जवळच्या बोरघाटातून पुढे रवाना झाला.