मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नावरुन शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असं निक्षून सांगितल्याचा दावा शिवसेना करीत आहे.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या काही खासदारांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.मात्र त्यांनी असमर्थता दर्शवली.
जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य ३० भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल. त्यामुळे हे शक्य नसल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितल्याचे शिवसेनेचे खासदार सांगत आहेत.