मुंबई : गुजरातच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे बॅनर मुंबईभर लावण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाला होत असलेला विलंबामुळे ही पोष्टरबाजी करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये भाजप सरकारला काठावर बहुमत मिळाले आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली. त्यामुळे ११७ जागांवरुन भाजप ९९ पर्यत मजल मारली तर काँग्रेसने चांगली कामगिरी करत ८० जागा पटकावल्या. त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली तरी नैतिक पराभव झाल्याची टीका विरोधकाकडून करण्यात येत आहे. भाजप चांगलेच कात्रीत सापडल्याने याचा फायता मराठा समाजाने उचल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. मराठा युवा क्रांतीने पोस्टरबाजी करत भाजपला इशारा दिलाय.
गुजरातमध्ये भाजपला १०० चा आकडा गाठता आला नाही. यावर आता जोरदार टीका होत आहे. भाजपची जादू कमी झाल्याचे हे धोतक असल्याचे बोलले जात आहे. हाच धागा पकड मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला गेलाय. हुकलेले शतक हा इशारा समजा! महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल तर, पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणे अवघड होईल. तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा, असा थेट इशारा भाजपला पोस्टरच्या माध्यमातून मराठा युवा क्रांतीने दिलाय.
गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी पाटिदार समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन छेडले. पाटिदार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याने गुजरातमध्ये याचा पटका भाजपला बसला. त्यामुळे महाराष्ट्रातही मराठा आरक्षण दिले नाही तर याची पुनरावृत्ती होईल, असा स्पष्ट इशारा या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्यामुळे भाजप आता मराठा आरक्षणावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.