मुंबई : महाराष्ट्रात सत्तांसघर्ष शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यावर आला आहे, असं वाटत असताना क्रिकेटच्या सामन्यासारखं काहीही होवू शकतं अशा स्थितीत हा सामना आला आहे. कारण शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्री कोण होणार तर आमचाच होणार यावर ठाम आहेत. मुख्यमंत्रीपद एक असलं तरी ते शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना हवं असल्याने, तडजोड होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे, आणि यावर लवकर निर्णय झाला नाही, तर मात्र शिवसेना आणि भाजपचा काडीमोड होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्याची एक-एक बातमी झी 24 तासचे रिपोर्टर तुमच्यासमोर ठेवत आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वंच पक्षात अंतर्गत खलबतं सुरू आहेत.
शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल, आणि शिवसेना-भाजपचा काडीमोड झाला, तर पुढील रणनिती काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.