'शिवसेनेच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार ही अफवाच'

याबाबत संजय राऊत म्हणाले.... 

Updated: Nov 7, 2019, 10:20 AM IST
 'शिवसेनेच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार ही अफवाच' title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेल्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक शेवटच्या टप्प्यात आला असता त्यात अधिक वेगाने घडामोडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपसोबतच शिवसेनेतही सत्तास्थापनेच्या हालचालींनी, भेटींनी आणि चर्चांनी जोर धरला आहे. याच धर्तीवर गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलववण्यात आली आहे. या बैठकीनंतर सर्व ५६ आमदारांना पंचतारांकित हॉटेल/ रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. ज्याविषयीचं चित्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. 

भेट आणि चर्चेनंतर आमदारांना शिवसेनेकडून रिसॉर्टवर पाठवण्यात येणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम देत राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'आम्हाला असं काहीही करण्याती मुळात गरज नाही. आमचे आमदार हे त्यांच्या भूमिकांवर ठाम आहेत. पक्षासाठी ते समर्पकपणे काम करत आहेत', असं म्हणत भेटीनंतर सर्व आमदार हे मतदार संघात परणार असून, ते पुन्हा आपल्या कामाला लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेच्या आमदारांविषयी अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांनी सर्वप्रथम त्यांच्या आमदारांची काळजी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आमदारांप्रती राऊत यांनी व्यक्त केलेला हा विश्वात पाहता शिवसेनेत फोडीच्या राजकारणाला जागा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय यावेली त्यांनी 'सामना' या मुखपत्रातील अग्रलेखात मांडण्यात आलेल्या काही मुद्द्यांवरही आपली प्रतिक्रिय़ा दिली.