विद्यार्थ्यांना भडकावू नका! वर्षा गायकवाड यांचं चर्चेचं आवाहन

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली

Updated: Jan 31, 2022, 04:34 PM IST
विद्यार्थ्यांना भडकावू नका! वर्षा गायकवाड यांचं चर्चेचं आवाहन title=

मुंबई : विद्यार्थी हे निरागस असतात, ही मुलं अठरा वर्षांच्या खालील आहेत. हे विद्यार्थी एके ठिकाणी कोरोनाशी लढतायत, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाशी लढतायत,  भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं आहे. भविष्यात या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही परीक्षा घेऊन अकरावी प्रवेश सुरुळीत करता यावा म्हणून हा आमचा उद्देश असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना भडकावू नका, चर्चा किंवा काही सूचना करायची असेल तर राज्य सरकारशी करावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

संघटनांचं काय म्हणणं आहे त्याविषयी आमच्या चर्चा करावी, आज दहावी आणि बारावीला तीस लाख विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राच्या भौगलिक परिस्थितीचा विचार करावा आणि काय समस्या असतील तर आमच्याशी चर्चा करावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

कोरोना असताना विद्यार्थ्यांना बाहेर का आणलं असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारल आहे.

विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन
दहावी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यात विविध ठिकाणी विरोध होत असून विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. मुंबईत धारावी परिसरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

तर नागपुरातू आणि औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ऑफलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नागपूरच्या तुकडोजी चौकात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनाला हिंसळ वळण लागलं. विद्यार्थ्यांनी चौकात उभी असलेली एक बस फोडली.