दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना 'हिदुस्थानी भाऊ'ची चिथावणी?

हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या विकास पाठक यांनीच दहावी आणि बारावीच्या मुलांना आंदोलनासाठी चिथावणी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

Updated: Jan 31, 2022, 04:31 PM IST
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना 'हिदुस्थानी भाऊ'ची चिथावणी? title=

मुंबई : हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या विकास पाठक यांनीच दहावी आणि बारावीच्या मुलांना आंदोलनासाठी चिथावणी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे. हिंदुस्थानी भाऊ यांच्या व्हीडिओनंतर हे आंदोलन भडकल्याचा आरोप आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादसह महाराष्ट्रातील काही शहरात तरुणांनी एकाच वेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.  

पण हा सहज सुटणारा प्रश्न नाही, की, एवढ्या मुलांना लिहायची सवय गेली कशी आणि त्यावर ऑनलाईन परीक्षांची मागणी, त्या परीक्षांचं देखील ऐनवेळी याचं नियोजन कसं करायचं. बहुतांश विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ऑफलाईन लेखी परीक्षेच्या विरोधात चिथावणी दिली जात असल्याचं या घटनेने समोर आलं आहे. एकाप्रकारे कॅम्पेन राबवून अशांतता करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा संशय आहे.

मुंबईतील धारावीत ज्या भागात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं घर आहे, त्या भागात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी आंदोलन केलं. या विद्यार्थ्यानी दहावी आणि बारावीच्या परीक्षा नकोत, कारण आमची लिहिण्याची सवय गेली आहे, असं म्हटलं आहे.

हिंदुस्थानी भाऊचं नाव विकास पाठक असं आहे, विकास पाठक हे एका मराठी कुटूंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं आहे, घरातील हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी हॉटेलात वेटरचं देखील काम केल्याचं सांगण्यात येत आहे.