भाजपच्या सर्व आमदारांची शुक्रवारी महत्तवाची बैठक, नक्की कारण काय?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. 

Updated: Jun 30, 2022, 11:00 PM IST
भाजपच्या सर्व आमदारांची शुक्रवारी महत्तवाची बैठक, नक्की कारण काय? title=

मुंबई : राज्यात अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज्यपाल भगत कोश्यारी यांनी या दोघांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान यानंतर आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. (maharashtra bjp all mla meeting will be held to 1 july evening at hotel trident on elect to speaker of assembly)

भाजपच्या सर्व आमदारांची उद्या 1 जुलैला बैठक पार पडणार आहे. ही बैठक हॉटेल ट्रायडेंटमध्ये संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन हे येत्या 2 आणि 3 जुलैला होणार आहे. 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकारणाचं या बैठकीकडे लक्ष असणार आहे.