मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

सायली पाटील | Updated: Nov 12, 2024, 10:17 AM IST
मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं  title=
Maharashtra Assembly Election sharad pawar reveales why chhagan bhujbal not elected as cm of state

Sharad Pawar on Chhagan Bhujbal: मविआमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला. सध्या विविध ठिकाणी प्रचारसभा आणि दौऱ्यांच्या निमित्तानं प्रवास करणाऱ्या पवारांच्या या वक्तव्यामुळं राजकारणात नव्या चर्चांनी जोर धरला आहे. कारण, पवारांनी भुजबळांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, पण असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं. 2004 मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, एका एका वृत्तपत्राला मुलाखत देतेवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट केला. 

हेसुद्धा वाचा : 'मोदींनी देव बदलल्याचा...', 'रामाचा नवा वनवास' म्हणत ठाकरेंच्या सेनेची अयोध्येवरुन कठोर शब्दांत टीका

 

'2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (तत्कालीन) राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे दिलं. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती', असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. 

2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे न गेल्याची खदखद अजित पवार यांनी सातत्यानं विविध प्रसंगी बोलून दाखवली. ज्याविषयी सांगताना शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्टच करत आपण मंत्रीपदं जास्त घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 'आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले', असं सांगताना नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले असले आणि त्यांचा पक्ष वेगळा असला तरीही आपण गांधी- नेहरुंच्या विचारांचे प्रणेते असल्यानं गोष्टी योग्य घडल्या, किंबहुना ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावं या मतामुळं भुजबळांनाही बळ दिल्याचं पवारांनी स्पष्टच सांगितलं.