मुंबईत दारुड्या आयएएस अधिकाऱ्याने दोघांना चिरडले

एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईतील मानखुर्द भागांत ही घटना घडली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2018, 10:56 AM IST
मुंबईत दारुड्या आयएएस अधिकाऱ्याने दोघांना चिरडले title=

मुंबई : एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईतील मानखुर्द भागांत ही घटना घडली.

एक ठार, एक जखमी

मध्यरात्रीच्या सुमारास मानखुर्द पोलिस चौकी येथे आयएएस शक्तिविल राजू यांची गाडी वेगानं आली आणि रस्त्यावरील दोघांना शक्तिविल राजू यांच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जख्मी आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांचे भाष्य करण्यास नकार

आयएएस शक्तिविल राजू हा मद्यावस्थेत होता असं प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते मात्र मेडिकल अहवाल आल्या शिवाय शक्तिविल राजू हे मद्य प्यायले होते का? यांवर भाष्य करण्यास पोलिसांनी नकार दिलाय.

पोलिसांवर राजकीय दबाव

शक्तिविल राजू हे कस्टम विभागात आयएएस अधिकारी असून त्यांच्याकडून झालेल्या अपघाताची नोंद होऊ नये याकरिता मानखुर्द पोलिसांवर राजकीय आणि आयएएस अधिकारी दबाव टाकत होते. मात्र त्यांच्या दबावाला न जुमानता मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी शक्तिविल राजू यांना अटक केली आहे.

 त्यांना लवकरच न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तसच सिसिटिव्ही फुटेज मिळाले असून पुरावा म्हणुन ते वापरले जाईल असही पोलिसांनी स्पष्ट केलंय.