आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...

Mumbai : न्यूयॉर्क आणि लंडननंतर  भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजींगला मागे टाकले आहे.  

वनिता कांबळे | Updated: Aug 29, 2024, 07:08 PM IST
आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...  title=

Mumbai  Asia billionaire capital: चीन नेहमीच भारतावर कुरघोडी करण्याचं प्रयत्न करतो. पण आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली आहे. मुंबई शहराने एका झटक्यात चीनला 'चीन टपाक डम डम'... केले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता अब्जाधीशांची 'राजधानी'  बनली आहे.  चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबई आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर बनले आहे.

हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने सर्वात श्रीमंत शहराचा मान मिळाला आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत आशियातील सर्वात अब्जाधीश  शहर असा किताब पटकावला आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2024 नुसार, मुंबईने भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीनुसार मुंबईत तब्बल 93 अब्जाधीश राहतात. 

मुंबई बनली नंबर वन 

कोविडनंतर चीनची अर्थव्यवस्था पूर्पपणे कोलमडली आहे. मॅन्युफॅक्चरिंग असो की गुंतवणूक, भारताने चीनला मागे टाकून झपाट्याने प्रगती केली आहे. अनेक विदेशी कंपन्यांनी चीन सोडून भारतात गुंतवणूक केली आहे. भारत आता अब्जाधीशांचे शहर देखील बनले आहे. अब्जाधीशांच्या संख्येत मुंबईने चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकले आहे. आशियातील सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत राहतात.  न्यूयॉर्क आणि लंडननंतर  जगात मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईतील अब्जाधीशांच्या संख्येत 58 ने वाढ झाली आहे. मुंबईसह राजधानी दिल्लीत 18 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  तर, दुसरीकडे चीनमधील अब्जाधीशांची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाली आहे.  

भारतातील टॉप टेन अब्जजाधीश

हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. या केलेल्या यादीनुसार गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकलं आहे.भारतातील या श्रीमंताच्या यादीत   एचसीएलचे शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  चौथ्या क्रमांकावर सिरम इंस्टीट्यूटचे सायरस पूनावाला, पाचव्या क्रमांकावर सन फार्माचे दिलीप सांघवी, सहाव्या स्थानावर आदित्य बिर्ला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला, सातव्या स्थानावर हिंदुजा ग्रुपचे गोपीचंद हिंदुजा, आणि त्यानंतर डिमार्टची मुख्य कंपनी अव्हेन्यू सुपरमार्टचे मालक  राधाकिशन दमानी, विप्रोचे अझीम प्रेमजी आणि बजाज उद्योगसमुहाचे निरज बजाज यांचा अनुक्रमे आठवे,  नववे , दहावे स्थान मिळविले आहे.