मुंबई : परळ टर्मिनसवरून उद्या धावणार पहिली लोकल धावणार आहे. दिवसभरात १६ लोकल परळ टर्मिनसवरून धावणार आहेत. तर मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दादर स्थानकावर पडणारा ताण करण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर परळ ‘टर्मिनस’ मध्ये करण्यात आले आहे. या नव्या परळ टर्मिनसचं उद्घाटन उद्या रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
परळ टर्मिनसवरुन कल्याण दिशेने दिवसभरात १६ लोकल धावणार आहेत. परळ टर्मिनसवरून सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्या या धिम्या असणार आहेत. एलफिन्स्टन रोड इथे झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर परळ स्थानकाचा कायापालट करण्यात आला.