आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिवसेना 'या' चिन्हाची मागणी करणार

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची पूर्वतयारी, निवडणूक आयोगाकडे मागणी   

Updated: Oct 8, 2022, 02:22 PM IST
आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिवसेना 'या' चिन्हाची मागणी करणार title=

Shivsena Symbole : शिवसेनेत  (Shiv Sena) मोठी उभी  फूट पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर (Dhanushyaban Symbole) शिंदे गटाने  (Shinde Group) दावा केल्याने याची सुनावणी निवडणूक आयोगासमोर (Election Commission) होणार आहे. तर निवडणूक आयोगानं त्वरीत सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोध दर्शवलाय. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर केलंय. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) त्वरीत सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदेंच्या पत्राची दखल घेऊन ठाकरेंना पत्र पाठवलं.

पण, ठाकरे त्वरीत सुनावणी घेण्यास तयार नाहीत. जोपर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तो पर्यंत सुनावणी घेऊ नये, कागदपत्रांसाठी अजून 4 आठवडे लागणार असल्याची विनंती उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला करणार आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानं निवडणूक आयोगापुढं सादर केलेली प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटानं केलाय.  

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही ठाकरे गटानं जोरदार आक्षेप घेतला. संबंधित कागदपत्रं दाखल केली असताना, आज दुपारपर्यंत म्हणणं मांडण्याचं पत्र कसं पाठवलं, अशा शब्दांत ठाकरे गटानं निवडणूक आयोगालाच जाब विचारलाय. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 4 आठवड्यांचा वेळ द्यावा, अशी मागणीही ठाकरे गटानं केलीय..

शिवसेनेकडून या चिन्हाची मागणी
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने पूर्वतयारी सुरु केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास दुसऱ्या चिन्हाची मागणी करणार आहे. शिवसेनेकडून निवडणूक आयोगांकडे वाघच्या चेहरा म्हणुन निशाणी मिळू शकते का अशी मागणी कारण्यात आलीय. जर धनुष्यबाणं हे चिन्ह गोठवलं तर तोंडावर आलेल्या पोटनिवडणीकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेने समोर आहे. 

निवडणुक आयोगाकडे चिन्ह म्हणून हती, सिहं ही चिन्ह आहेत, वाघाचा चेहरा किंवा पूर्ण वाघ अशी चिन्ह उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सेना काय करणार हा मोठा प्रश्न आहे