Mumbai Local Mega Block: रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कुठे आहे मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक!

Mumbai Local Mega Block : मुंबईत उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. कोणत्या मार्गावर हा ब्लॉक असणार ते जाणून घ्या.

Updated: Oct 8, 2022, 01:42 PM IST
Mumbai Local Mega Block: रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कुठे आहे मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक! title=

Mumbai Local Mega Block : मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway Line) उद्या रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे (Maintenance works) करण्यासाठी मेगा ब्लॉक (block) घेतला गेला आहे. या मेगा ब्लॉकमध्ये कोण कोणत्या मार्गांवरील रेल्वेचे वेळापत्रक काय असेल हे जाणून घ्या.

पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नाही, पण...

रविवार, 9 ऑक्टोबर 2022 रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही. मात्र, पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक असणार आहे. वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यानच्या अप जलद मार्गांवर शनिवार, 8 ऑक्टोबर आणि रविवार, 9 ऑक्टोबर  2022च्या मध्यरात्री 23.50 ते 02.50 पर्यंत पश्चिम रेल्वेने ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी आणि रात्रीचा ब्लॉक असेल. 01.30 ते 04.30 तासांपर्यंत डाऊन जलद मार्गांवर 3 तास ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे रविवार 9 ऑक्टोबर 2022 रोजी देखभालीचे काम करण्यासाठी आपल्या  उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ठाणे - कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत गाड्या बंद राहणार आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी  पोहोचतील.
 
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे  स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील  आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिरा पोहोचेल. 

हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

कुर्ला- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत  सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत  सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी -पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.